६ एप्रिल, हनुमान जयंतीची संपूर्ण माहिती...
धार्मिक

६ एप्रिल, हनुमान जयंतीची संपूर्ण माहिती…

“अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान,एक मुखानें बोला,बोला जय जय हनुमान”

हनुमानाचा जन्म हा अंजनेरी या पर्वतावर झाला.हनुमान हा अंजनी आणि केसरी याचा मुलगा आहे. हनुमानाला लहानपणीच सगळ्या शक्ती मिळाल्या होत्या.हनुमान लहान असताना त्यांना भूक लागली होती आणि त्यांनी लाडू म्हणून सूर्यालाच गिळायला गेले होते,तेव्हा संपूर्ण पृथ्वीलाच वाचवण्यासाठी इंद्रदेवाने हनुमानाला शस्त्र फेकून मारले आणि हनुमान मुरच्छित झाले.

पवन देवांनी जेव्हा हनुमानाला या अवस्थेत पहिले आणि पवन देवांनी पृथ्वी वरचा सगळा वायू हा ओढून घेतला आणि पृथ्वी वरच्या सगळ्याचा जीव हा धोक्यात होता, तेव्हा सगल्या देवांनी मिळून हनुमानाला मूर्च्छित अवस्थेतून बाहेर काढले आणि हनुमानाला सगळ्यांनी मिळून सगळ्या शक्ती ह्या प्रदान केल्या आणि पवनदेवांनी प्राणवायू हा सोडला.

मित्रानो राम हे वनवासाला गेल्यावर राम आणि हनुमान याची भेट झाली. रामाचा सेवक म्हणून हनुमानाला ओळखले जाते.तसेच हनुमान हे रामायानातील सगळ्याचे आवडते रामभक्त होय.तसेच रामायणात हनुमान यांनी युद्धात खूप मदत केली आणि हनुमानाच्या वनरसेनेमुळे रामानी रावणाशी युद्ध देखील जिकंले.

हनुमान जयंतीची माहिती:-

मित्रांनो चैत्र महिन्यापासून आपले मराठी नवीन वर्ष सुरु होते.तसेच चैत्र महिन्यांत अनेक सण देखील साजरे केले जातात.त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.या वर्षी ६ एप्रिल ला हनुमान जयंती आली आहे आणि हि खूप उत्साहात साजरी केली जाते.चैत्र पौर्णिमेला हनुमान मंदिरात पहाटेपासुनच कीर्तन आणि भजनाला सुरुवात होते.

चैत्र पौर्णिमेला सकाळी सूर्योदय झाला कि हनुमानाचा जन्म होतो आणि हनुमानाचा जन्म झाला कि कीर्तन संपते आणि हनुमानाचा जन्म हा साजरा केला जातो आणि सगळ्या भक्तांना प्रसाद हा वाटला जातो.अश्या प्रकारे हनुमान जयंती साजरी करण्यात येते.हनुमान जयंतीला गुळ आणि फुटण्याचा नैवद्य हा दिला जातो. बऱ्याच मारुतीच्या मंदिरात महाप्रसाद देखील असतो.

मित्रानो हनुमानाला मारुती,अंजनीपुत्र,रामभक्त,पवनपुत्र,महाबली,वायुपुत्र अश्या अनेक नावानी ओळखले जातात.तसेच शनिवार हा हनुमानाचा शुभ वार मानला जातो. तसेच कोणाला साडेसाठी असेल त्यांनी शनीवारी आणि मंगळवारी हनुमानाचे दर्शन हे आवश्य घ्यावे.

हनुमानाला तेल,शेंदूर,रुईचं फुल आणि पान देवल अर्पण करतात.हनुमान मंदिरात हनुमानासमोर नारळ देखील फोडला जातो.हनुमान हा महादेवाचा अवतार देखील मानला जातो. हनुमान हे संकटाचे हरण देखील करतात.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट